हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. एनसीबीने या प्रकरणाचा छडा लावणे अतिशय मनावर घेतल्याचे दिसत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने हैदराबादमध्ये अटक केली होती. त्यानंतर सुशांतचा कूक आणि हाऊस हेल्पर यांनाही पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची देखील पुन्हा एकदा चौकशी झाली असता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती आणि तिच्या पतीचे नाव समोर आले आहे.
https://twitter.com/APandday/status/1401795938486607873
एनसीबीद्वारे रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू असताना असून तिनेे या सुशांतची बहीण श्वेता व तिचा पती या दोघांचेही नाव घेतले आहे. सुशांतची बहीण श्वेता आणि तिचा पती आधीपासूनच ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आरोप रियाने लावला आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविक यांवर सुशांतला अंमली पदार्थांचे व्यसन लावल्याचे आरोप आहेत.
https://www.instagram.com/p/BsoNMIqFG8F/?utm_source=ig_web_copy_link
मात्र या प्रकरणी रियाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली असता यावेळी तिने सुशांतच्या बहिणीचे आणि तिच्या पतीचे नाव घेऊन या केसला वेगळेच वळण दिले आहे. दरम्यान अजूनही एनसीबी याबाबत चौकशी करीत असून अधिक तपस करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CDzVIzRFI5I/?utm_source=ig_web_copy_link
चौकशी दरम्यान रियाने असा दावा केला आहे की, सुशांतची बहीण श्वेता आणि तिचा पती हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्सचे सेवन करतात. सुशांत माझ्या आयुष्यात येण्या पूर्वीपासूनच ड्रग्ज घेत होता. तो अंमली पदार्थांच्या पूर्णपणे आहारी गेलेला होता. याबद्दल त्याच्या कुटुंबीयांनादेखील माहीत होते. मी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर माझ्याकडून त्याला ड्रग्स मिळतील, अशी त्याला आशा होती. त्याचे हे व्यसन सोडवण्याचा मी अनेकवेळा प्रयत्न केला. त्याने रुग्णालयात दाखल व्हावे असे मी त्याला अनेकवेळा सांगितले होते. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची बहीणच त्याला ड्रग्स पुरवायची. अशा आशयाचे एकंदर रियाचे स्टेटमेंट असून याबाबत एनसीबीने वेळ न घालवता पुढील तपासास वेग घेतला आहे.