हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN Card : जर आपल्याकडे कोणत्याही बँकेचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आजपासून आर्थिक व्यवहारांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नवीन नियमांनुसार आता ग्राहकाला 20 लाखांपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्डची माहिती देणे बंधनकारक असेल.
हा नवीन नियम 26 मे 2022 पासून लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, आता एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपये जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी ग्राहकाला आधार कार्ड PAN Card ची माहिती द्यावी लागेल. जर ग्राहकाने असे केले नाही, तर त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस देखील मिळू शकेल.
10 मे रोजी जारी केलेल्या एका अधिसूचनेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून यासंबंधीची माहिती ग्राहकांना दिली गेली आहे. ज्या खातेदारांचे खाते सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना देखील हा नियम लागू असेल, असे यामध्य सांगण्यात आले आहे. तसेच एकापेक्षा जास्त बँकेच्या खात्यांमधील ट्रान्सझॅक्शनवरही हा नियम लागू होईल. PAN Card
ज्या ग्राहकाला नवीन खाते उघडायचे असेल त्यालाही हा नवा नियम लागू होईल. जर ग्राहकाकडे पॅन कार्ड नसेल तर त्याला 20 लाख रुपयांच्या ट्रान्सझॅक्शनच्या 7 दिवस आधी पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल. करचोरी रोखण्यासाठी सरकार कडून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. पॅनकार्ड आधारकार्डपासून त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती सरकारकडे आल्याने करचुकवेगिरीची शक्यता कमी होईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर पहा
Bamboo Farming : सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा लाखो रुपये !!!
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे
Honda कडून लवकरच लॉन्च केली जाणार दुसरी हायब्रिड कार !!! नवीन फीचर्सविषयी जाणून घ्या
Stock Market Update : येत्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ होणार की घसरण ???