Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :गेल्या काही सत्रांतील तेजीनंतर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. तसेच जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 67 रुपयांनी घसरून 50,752 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी सोन्याचा दर 50,840 वर उघडला होता, पण विक्रीमुळे तो लवकरच 0.13 टक्क्यांच्या तोट्यावर आला आणि भाव सुमारे 100 रुपयांनी घसरून 50,752 वर आला.

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. MCX वर आज सकाळी चांदीचा भाव 247 रुपयांनी घसरून 61,287 रुपये प्रतिकिलो झाला. यापूर्वी चांदीचा दर 61,526 रुपये प्रतिकिलोवर उघडला होता आणि विक्रीमुळे, लवकरच त्यात 0.40 टक्क्यांनी घसरण दिसून आली

अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. यूएस सराफा बाजारात स्पॉट सोन्याचा भाव 0.46 टक्क्यांनी घसरून $1,845.61 प्रति औंस झाला, तर चांदी 0.97 टक्क्यांनी घसरली. त्याची स्पॉट किंमत आज $21.77 प्रति औंस आहे.

Gold Price Today

Gold Price Today, 29 June 2021: Gold continue to remain below Rs 47,000 mark, check prices in metro cities | Bullion News | Zee News

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,980 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

Gold prices today: Rates remain unchanged; 10 grams of 24-carat gold costs Rs 47,220

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,750 रुपये
पुणे – 47,700 रुपये
नागपूर – 47,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,980 रुपये
पुणे -52,030 रुपये
नागपूर – 52,030 रुपये

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold price today: 10 grams of 24-carat sold at Rs 52,800; silver at Rs 71,000 per kilo

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 & 24 Carat Gold Price Today in India for Last 10 Days

YEAR
STANDARD GOLD 22K
1 GRAM 10 GRAM
PURE GOLD 24K
1 GRAM 10 GRAM
24 May 2022 Rs. 4775.00 Rs. 47750 Rs. 5209.00 Rs. 52090
23 May 2022 Rs. 4715.00 Rs. 47150 Rs. 5143.00 Rs. 51430
22 May 2022 Rs. 4705.00 Rs. 47050 Rs. 5133.00 Rs. 51330
21 May 2022 Rs. 4705.00 Rs. 47050 Rs. 5133.00 Rs. 51330
20 May 2022 Rs. 4670.00 Rs. 46700 Rs. 5095.00 Rs. 50950
19 May 2022 Rs. 4630.00 Rs. 46300 Rs. 5051.00 Rs. 50510
18 May 2022 Rs. 4610.00 Rs. 46100 Rs. 5079.00 Rs. 50790
17 May 2022 Rs. 4655.00 Rs. 46550 Rs. 5078.00 Rs. 50780
16 May 2022 Rs. 4625.00 Rs. 46250 Rs. 5045.00 Rs. 50450
15 May 2022 Rs. 4625.00 Rs. 46250 Rs. 5045.00 Rs. 50450

 

हे पण वाचा : 

BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा

Stock Market Update : येत्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ होणार की घसरण ???

FD : आता ‘या’ बँकेकडूनही FD वर मिळणार जास्त व्याज

New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च

Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV