नवी दिल्ली । जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर जाणून घ्या नवीन वर्षापासून ऑनलाइन कार्ड पेमेंटचे नियम बदलणार आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुरक्षितता लक्षात घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा नियम लागू करणार आहे.
ऑनलाइन पेमेंट आणखी सुरक्षित करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवेद्वारे स्टोअर केला गेलेला ग्राहक डेटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि ट्रान्सझॅक्शनसाठी एनक्रिप्टेड टोकन वापरण्यास सांगितले आहे.
कार्ड डिटेल्स स्टोअर केले जाणार नाहीत
नवीन नियमानुसार, मर्चंट वेबसाइट किंवा अॅप यापुढे ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट दरम्यान तुमच्या कार्डचे डिटेल्स स्टोअर करू शकणार नाहीत. आणि मर्चंट वेबसाइट किंवा अॅप ज्यावर तुमचे कार्ड डिटेल्स अजूनही स्टोअर आहेत, ते तेथून हटवले जातील. याचा परिणाम असा होईल की, नवीन वर्षापासून तुम्ही तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डने ऑनलाइन खरेदी केल्यास किंवा कोणत्याही पेमेंट अॅपवर डिजिटल पेमेंटसाठी कार्ड वापरल्यास कार्डचे डिटेल्स स्टोअर केले जाणार नाहीत.
नवीन नियम काय म्हणतो ?
1 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन पेमेंट करताना, तुम्हाला 16 अंकी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह संपूर्ण कार्ड डिटेल्स एंटर करावा लागेल किंवा एनक्रिप्टेड टोकनचा पर्याय निवडावा लागेल. आता काय होते की, तुमचा कार्ड नंबर पेमेंट अॅप किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्टोअर असतो आणि तुम्ही फक्त CVV आणि OTP टाकून पेमेंट करू शकता.
RBI ची मार्गदर्शक तत्त्वे
RBI ने मार्च 2020 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती की, डेटा सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापाऱ्यांना त्यांच्या वेबसाइटवर कार्ड डिटेल्स स्टोअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. RBI ने सप्टेंबर 2021 मध्ये या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि कंपन्यांना वर्षाच्या अखेरीस नियमांचे पालन करण्यास सांगितले आणि त्यांना टोकनायझेशनचा पर्याय दिला.
RBI ने 1 जानेवारी 2022 पासून सर्व कंपन्यांना त्यांच्या सिस्टीममधून स्टोअर केलेला क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा हटवण्याचे आदेश दिले होते.
बँक करत आहे अलर्ट
काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना या नवीन नियमांबाबत सतर्क करण्यास सुरुवात केली आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना “1 जानेवारी 2022 पासून आपल्या कार्डच्या सुरक्षिततेसाठी RBI च्या नवीन आदेशानुसार मर्चंट वेबसाइट/अॅपवर तुमचे HDFC बँक कार्ड डिटेल्स डिलीट करण्यास सांगितले आहे.” आता प्रत्येक वेळी पेमेंटसाठी, ग्राहकाला एकतर संपूर्ण कार्ड डिटेल्स एंटर करावा लागेल किंवा टोकनायझेशन सिस्टीम वापरावी लागेल.
टोकनायझेशन म्हणजे काय ?
टोकनायझेशनच्या मदतीने, कार्डधारकाला त्याच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे सर्व डिटेल्स शेअर करण्याची गरज नाही. टोकनायझेशन म्हणजे मूळ कार्ड क्रमांक वैकल्पिक कोडद्वारे बदलणे. या कोडलाच टोकन म्हणतात.
टोकनायझेशन प्रत्येक कार्ड, टोकन रिक्वेस्टर आणि मर्चंट यांच्यासाठी युनिक असेल. टोकन तयार झाल्यानंतर, टोकनयुक्त कार्ड डिटेल्स मूळ कार्ड क्रमांकाच्या जागी वापरला जाऊ शकतो. ऑनलाइन पेमेंटसाठी ही सिस्टीम जास्त सुरक्षित मानली जात असल्याचे म्हंटले जात आहे.
सध्याचे नियम काय आहेत ?
जेव्हा तुम्ही तुमचे कार्ड, डेबिट किंवा क्रेडिट ट्रान्सझॅक्शनसाठी वापरता, तेव्हा तुम्हाला कार्डचे 16 नंबर, कार्ड एक्सपायरी डेट, CVV तसेच वन-टाइम पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन पिन यासारखी माहिती वापरणे आवश्यक आहे. कोणतेही ट्रान्सझॅक्शन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा या सर्व गोष्टी योग्यरित्या एंटर केल्या जातात.
1 जानेवारीला ‘हे’ काम करावे लागणार
1 जानेवारीपासून, तुम्ही जेव्हा एखाद्या मर्चन्टला पेमेंट कराल तेव्हा, तुम्हाला ऑथेंटिकेशनसाठी (additional factor of authentication -AFA) संमती द्यावी लागेल. एकदा संमती रजिस्टर्ड झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या कार्डचा CVV आणि OTP टाकून पेमेंट पूर्ण कराल. जेव्हा तुमचे कार्ड डिटेल्स एनक्रिप्टेड पद्धतीने एंटर केले जातात, तेव्हा डेटा फसवणूक किंवा छेडछाड होण्याचा धोका कमी केला जातो.