क्रेडिट कार्ड खरेदी करताना सावधान! मार्केटमध्ये सुरु झाला नवा स्कॅम

Credit Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात आर्थिक क्षेत्रात खूप मोठी प्रगती झालेली आहे. आता सगळेच व्यवहार डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आजकाल क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. अगदी सामान्यपणे सगळेच लोक त्याचा सर्रास वापर करतात. बहुतांश नोकरदार वर्गाकडे देखील आजकाल क्रेडिट कार्ड असतात. केवळ बँका नाहीतर फायनान्स कंपनीने देखील या क्षेत्रात आता प्रगती केलेली आहे. एका कॉलवर तुम्हाला सहज नवीन क्रेडिट कार्ड मिळवणे सोप्पे झाले आहे. परंतु प्रत्येक गोष्टीचे काही ना काही फायदे आणि तोटे असतात. क्रेडिट कार्डचे ज्याप्रमाणे आपल्याला फायदा घेता येतात, तसेच अनेक घोटाळे देखील समोर आलेले आहेत. मार्केटमध्ये सध्या नवीन क्रेडिट कार्डचा स्कॅम चालू झालेला आहे. तरुणांसोबत खास असे प्रकाश घडताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे ज्या नोकरदार वर्गांच्या पगार कमी आहे. त्यांच्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. कारण अशा लोकांना लक्ष करून त्यांचा सीबील स्कोर खराब होत आहे.

भारतातील डेटा गोपनीयता कायद्याचा चुकीचा फायदा घेऊन अनेक एजन्सी लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करतात. तसेच तुम्हाला कॉल करतात आणि मोठी मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड घेण्यासाठी सांगतात. या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट लिमिट आहे, असे सांगून आमिष दाखवतात. ते तुम्हाला हे क्रेडिट कार्ड खरेदी करण्यासाठी फोर्स करतात. क्रेडिट कार्डची मोठ्या रकमेची लिमिट पाहून अनेक सामान्य लोक फसतात. परंतु जेव्हा तुम्ही या क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करता. त्यावेळी अगदी कमी मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड ते तुम्हाला देतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी 50000 रुपयांचे लिमिट असलेले क्रेडिट कार्ड देऊन असे सांगितले असेल, तर प्रत्यक्षात केवळ 25 हजार मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड दिले जाते. परंतु असे काही घडल्यास त्याचा तुमच्यावर क्रेडिट स्कोरवर मोठा परिणाम होतो

सिबिल स्कोर कसा खराब होतो

क्रेडिट कार्डचा वापर एक प्रकारचा कर्जाप्रमाणे केला जात. तुम्ही जर क्रेडिट मर्यादेचा मोठा भाग खर्च केला, तर तुमच्या क्रेडिट स्कोरवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हणजेच जर तुमची मर्यादा 25 हजाराची असेल, आणि तुम्ही 20 हजार रुपये खर्च करत असाल तर तुमचा युटीलायझेशन रेशो 75 टक्के होईल. आणि हा रेशो 30% पेक्षा कमी असावा. परंतु असे न झाल्याने तुमचा सीबील स्कोर खराब होऊ शकतो.

फसवणूक कशी टाळायची ?

अशाप्रकारे फसवून होऊ नये म्हणून तुम्ही थेट बँकांची संपर्क साधावा. नवीन क्रेडिट कार्डवर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इतरत्र कुठेही न जाता थेट बँकेची संपर्क साधून हे क्रेडिट कार्ड घ्यावे. बँकेने दिलेली माहिती ही जास्त विश्वासहार्य आणि सुरक्षित असते. जर कोणती एजन्सी तुम्हाला फोन करून क्रेडिट कार्ड ऑफर करत असेल, तर अशा कोणत्याही स्कॅमला बळी पडू नका