New Song : चाळिशीतल्या चोरांच्या ‘साला कॅरेक्टर’ गाण्याला रसिकांची पसंती; व्हिडीओ पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Song) नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याचे नाव ‘साला कॅरेक्टर’ असे आहे. हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून रसिकांनी चांगली पसंती दिली आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे अफलातून संगीत लाभले आहे.

मस्तीने भरलेल्या या धम्माल गाण्यात ‘चाळीशी’तील मित्र मैत्रिणींचे गेट टूगेदर दिसत आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय कमाल आहे. (New Song) चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

साला कॅरॅक्टर Saala Character Video Song | अलीबाबा आणि चाळीशीतले चोर Alibaba Aani Chalishitale Chor

विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, संदीप देशपांडे निर्माते आहेत. हे ‘चाळीशी’तील चोर येत्या २९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (New Song) गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” ‘साला कॅरेक्टर’ हे गाणं करताना ते सर्व वयोगटातल्या लोकांना सहज गुणगुणता यावं आणि नाचता यावं असा विचार होता ज्याला अजित परब आणि वैभव जोशी या दोन्ही अवलियांनी पुरेपूर न्याय दिला आहे.गाण्यावरून चित्रपटात काय धमाल येईल, याचा अंदाज तुम्ही बांधूच शकता.”

चाळीशीनंतरच जगण्याची खरी मजा.. (New Song)

आपल्या आगामी नव्याकोऱ्या धमाल चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले की, ‘हल्ली चाळीस हा वयाचा फक्त आकडा आहे. परंतु चाळीशीनंतरच जगण्याची खरी मजा सुरु होते. हे असे वय आहे जिथे आपण तरुणही नसतो आणि वयस्करही. त्यामुळे या वयात एक वेगळीच भावना असते. चाळीशीतील हीच भावना या चित्रपटात मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. विशेषतः चाळीशीतील प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटेल’. (New Song)