BF.7 च्या रूपाने आला कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट; काय आहेत लक्षणे??

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असून सर्वसामान्यांचे जीवन आधीसारखे सुरळीतपणे सुरु आहे. मात्र त्यातच आता चीनमध्ये ओमिक्रॉनच्या २ नव्या व्हेरिएन्टने खळबळ उडवली आहे. BF.7 आणि BA.5.1.7 असे या नव्या व्हेरिएन्टचे नाव आहे. यातील BF.7 हे पूर्वीच्या BA.5 व्हेरियंटचे सबव्हेरियंट असून हा व्हेरिएन्ट वाऱ्यासारखा पसरू शकतो.

येत्या काही दिवसात लवकरच थंडी पडेल त्यामुळे BF.7 व्हेरिएन्ट धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये हा व्हेरिएन्ट आढळून आला आहे. फक्त चीनमध्येच नव्हे तर बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क आणि इंग्लंडमध्येही तो वेगाने पसरत असल्याची बातमी आहे.

ही आहेत लक्षणे –

शिंकणे
खोकला
थकवा
स्नायू दुखणे आणि वेदना
डोकेदुखी
घसा खवखवणे