हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवले. आता न्यूझीलंडसमवेत तीन राष्ट्रांमध्ये समुद्रात आलेल्या भूकंपामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागात बुधवारी भूकंपाचे जबर धक्के जाणवले.
समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिश्टर स्केल इतका मोठा असल्याने या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनिया या देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तिव्रता अधिक असल्याने या देशांमधील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दक्षिण पॅसिफिकमधील लॉयल्टी बेटांजवळ समुद्राच्या तळाखाली १० किमी अंतरावर मोठा भूकंप झाला. हा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता असं अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे या संस्थेनं स्पष्ट केल्याचं एएफपीने म्हटलं आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’