धक्कादायक!! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील शौचालयात कचऱ्याच्या डब्यात एका नवजात बाळाचा मृतदेह (New born baby) आढळला. काल रात्री १०:३० च्या सुमारास हा मृतदेह आढळून आला, त्यानंतर विमानतळ सुरक्षा आणि जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नवजात बाळाला मृत घोषित केले… या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बाळाला येथे कोणी व का सोडले याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी मृतदेह आणि या भयंकर गुन्ह्यामागील गुन्हेगाराची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला आहे. लहान बाळाचा मृतदेह कचऱ्याच्या डब्ब्यात कोणी टाकला? यासाठी कोण जबाबदार आहे याच शोध घेण्यासाठी अधिकारी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहेत. पोलिसांचा अंदाज आहे की, कोणीतरी बाळाला सोडून निघून गेले असावे. त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी केली जात आहे.

मुंबई विमानतळ हे देशातील सार्वधिल वर्दळीचे विमानतळ म्हणून ओळखले जाते. देशविदेशातून पर्यटक मुंबई विमानतळावर उतरतात. त्यादृष्टीने मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकही मोठया प्रमाणावर तैनात असतात. अशा परिस्थितीत एका नवजात बाळाला कचऱ्याच्या डब्ब्यात टाकण्याची किंमत कोणी केली तरी कशी? असा सवाल केला जातोय. मुंबई विमानतळावरील सुरक्षेवर सुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय…. पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास केला जात आहे.