Beer Made From Urine : ‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

Beer Made From Urine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंगापूर । Beer Made From Urine : आजकाल सिंगापूरमधील एका ब्रुअरीमध्ये एक वेगळ्या प्रकारची बिअर मिळत आहे. सहसा बिअर ही फळे आणि धान्य सडवून ते अल्कोहोलमध्ये मिसळून बनवली जाते. मात्र, सिंगापूरमध्ये सांडपाणी आणि लघवीपासून बिअर बनवली जात आहे. या बिअरला न्यूब्रू असे नाव देण्यात आले आहे. या बिअरला जगातील सर्वात इको-फ्रेंडली बिअर असेही म्हंटले जात आहे.

Newbrew, a beer made using Newater, to go on sale in Singapore - Chit-Chat  - Mugentech

ANI ने दिलेल्या बातमीनुसार, एका खास पद्धतीने बनवलेल्या लिक्विडपासून न्यूब्रू ही बिअर बनवली जाते. यामध्ये नाल्यातील पाणी आणि कचरा यांना रिसायकल केले जाते. यानंतर ते फिल्टर केले जाते. या खास लिक्विडचे नाव निवॉटर असे आहे. हे 20 वर्षांपासून सिंगापूरमध्ये मिळत आहे. तिकडच्या बिअरमध्ये 95 टक्के निवॉटर मिसळले जाते. Beer Made From Urine

Dallas' 10 best breweries for 2020 keep the craft beer flowing - CultureMap  Dallas

सिंगापूरच्या वॉटर अथॉरिटीने देशातील पाणी टंचाईच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दुकाने आणि बारमध्ये हे निवॉटर उपलब्ध पेये लाँच केले करून दिले आहेत. एका रिपोर्ट्स नुसार, पिण्यासाठी वापरण्यापूर्वी या न्यूवॉटरला अनेक प्रकारच्या तपास प्रक्रियेतून जावे लागते. त्यानंतरच हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित बनते. वॉटर अथॉरिटीने पुढे सांगितले की,”हा देश चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. तसेच समुद्राच्या पाण्याचा वापर हा पिण्यासाठी करता येत नाही. अशा स्थितीत पिण्याच्या पाणी मिळवच्या पर्यायावर येथील सरकार अनेक वर्षांपासून काम करत आहे.” Beer Made From Urine

Newbrew beer - Investvine

या पाणीटंचाईमुळे सिंगापूरला अनेक वर्षांपासून मलेशियाकडून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबरोबरच येथे पावसाचे पाणी साठवून त्याचाही पुनर्वापर केला जातो आहे. या सर्व प्रयत्नांनंतरही सिंगापूरला आपल्या गरजेपैकी फक्त 50 टक्केच पाणी मिळते. उर्वरित कामासाठी त्यांना नाल्यातील किंवा सांडपाणीच प्रक्रिया करून वापरावे लागते. दुसऱ्या एका रिपोर्ट्स नुसार, 2060 सालापर्यंत लोकसंख्या वाढीमुळे सिंगापूरमध्ये पाण्याची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत तिथे निवॉटरचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जातो आहे. Beer Made From Urine

Fall Beer Season Brings Pumpkin, Oktoberfest, Much More – Dan's Papers

हे पण वाचा :

Multibagger Stock : एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Stock Market : IT शेअर्समध्ये गुंतवणूक करताय… जरा थांबा !!! तज्ञ काय म्हणतात ते पहा

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या

Banking fraud : बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय ??? अशा प्रकारे करा अपडेट