सासऱ्याकडे केलेली मागणी ‘ती’ पूर्ण न झाल्याने नवविवाहितेची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – आजकाल लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून लोक आत्महत्या करत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये मोबाईलची मागणी पूर्ण न झाल्याने नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव अंगुरी असे आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
हे प्रकरण कोतवाली परिसरातील शहा पहारी गावातील आहे. हमीरपूरच्या पहरा येथील चंद्रशेखर यांनी दीड वर्षांपूर्वी आपली मुलगी अंगूरी हिचा विवाह कोतवाली परिसरातील शाह पहारी येथील नरेंद्रसोबत लावला होता. शनिवारी सायंकाळी अंगूरीने तिचा मेहुणा सुमित याच्यामार्फत सासरा मणिराम यांच्याकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्यास सांगितले. त्यावर सासरच्यांनी मोबाईल घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र रात्री उशिरा अंगुरीने खोलीत जाऊन विष प्राशन केलं. तिची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मेडिकल कॉलेज झाशी येथे रेफर केलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. विवाहितेची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचे सासरच्यांकडून सांगण्यात आले आहे. एका क्षुल्लक विवाहितेने केलेल्या आत्महत्येमुळे मृत तरुणीच्या घरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.