नवदाम्पत्य नांदेड टू सातारा : लग्नानंतर देवदर्शना ऐवजी थेट छ. उदयनराजे भोसले यांचे भेटीला 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

छ. शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वशंज छ. उदयनराजे भोसले हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलने चर्चेत असतात. तसेच त्याचे चाहते त्याच्या स्टाईलवर भरभरून प्रेम करताना पहायला मिळतात. मात्र नांदेडचा एक नवदांम्पत्य जोडपे लग्नानंतर चक्क देवदर्शनाला न जाता थेट सातारा येथील जलमंदिरमध्ये छ. उदयनराजे भोसले यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यामुळे छ. उदयनराजे भोसले यांची महाराष्ट्रातील विविध कोपऱ्यात असलेली क्रेझ व चाहते याचे उदाहरण पहायला मिळाले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीत लग्न झाल्यानंतर नवदांम्पत्य देव देवतांचे दर्शन जाण्याची परंपरा आहे. पण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी नांदेडवरून नवदांपत्य थेट जलमंदिरला पोहोचले. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले दाम्पत्यांनी महाराजांना नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.

नांदेडवरून आलेले शहाजी शंकरराव काळे आणि नवविवाहीता पत्नी मनीषा शहाजी काळे यांनी छ. उदयनराजे भोसले यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी शहाजी काळे म्हणाले, माझे लग्न आजच झाले असून कोणत्याही देवदर्शनाला न जाता. मी छ. उदयनराजे भोसले यांचे दर्शन घेण्यासाठी सातारा येथे आलो आहे. आम्हांला महाराजांनी आशिर्वाद दिल्याने मी त्याचे आभार मानतो.

Leave a Comment