राजगुरूनगर प्रतिनिधी | ३०जुलै २०१८ रोजी चाकणमध्ये मराठा मोर्चाचे ठोक आंदोलन करण्यात आले. या आदोलनाला हिंसक वळण लागल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. तसेच परिस्थती काबूत आणण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिसांना देखील जमावाने मारहाण केली. त्यात दोन पोलीस कर्मचारी अतिगंभीर स्वरूपात जखमी झाले. तर पुणे महानगर परिवहन विभागाच्या अनेक बस जाळून कोळसा बनवण्यात आल्या. या प्रकरणाच्या तपासाने वेग धरला असून माजी आमदार दिलीप मोहिते यांना अटक होणार या चर्चेने राजगुरु नगर परिसरात चांगलीच शांतता पसरली आहे.
महाजनांच्या त्या वक्तव्याने आमदार घोलपांचा जीव भांड्यात पडला
३० जुलै २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचारास दिलीप मोहिते जबाबदार आहेत का? त्यांनी चेतावणी खोर वक्तव्य दिले होते का? त्यांच्या विरोधात पोलिसांकडे ठोस पुरावा आहे का ? त्यांना अटक कशी आणि कधी होणार? या आशा प्रश्नांनी राजगुरू नगर परिसरात चर्चेचे मोहळ उठले आहे. तर येथील मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. दिलीप मोहिते हिंसाचाराच्या दिवशी सकाळी भाषण देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी आंदोलन करर्त्यांना भाषण दिले आणि जिल्हा बँकेच्या बैठकीला पुण्याला निघून गेले. जिल्हा बँकेच्या बैठकीला ते उपस्थित देखील राहिले. मग त्यांचा या हिंसाचारात सहभाग तो काय या बदल सर्वांच कुतूहल आहे. तर निवडणूक जवळ आल्याने हा मोहितेंचाच स्टंट आहे का असा देखील सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
धोनी तू निवृत्त हो ! अन्यथा तुला खेळू दिले जाणार नाही
चाकण हिंसाचाराचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून केला जात आहे. कारण चाकणचा नव्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालयात समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या संदर्भात पोलीस आयुक्तांना विचारले असता त्यांनी दंगल माजवणारांच्या विरोधात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्या पुरावाच्या आधारेच आम्ही पुढील कारवाही करणार आहे असे म्हणले आहे. तसेच दिलीप मोहिते यांचे नाव घेण्याचे आयुक्तांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. दरम्यान दिलीप मोहिते यांनी खेड राजगुरूनगरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज देखील केला आहे. मात्र अटकेच्या संदर्भात कसलीच कार्यालयीन कागदपत्रांची तयारी झालेली नाही. नुसत्या अटकेच्या शक्यतेवर अटक पूर्व जामीनाची सुनावणी घेतली जाऊ शकत नाही असे न्यायालयाने दिलीप मोहिते यांना सुनावले आहे. त्यामुळे राजगुरूनगरच्या राजकारणात दिलीप मोहिते यांच्या अटकेचा सनपेन्स काय आहे.
भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो ; आमदाराचा खळबळजनक दावा