काबूल । तालिबानने अफगाणिस्तानात ताबा मिळवला आहे. तालिबानच्या भीतीमुळे लोक कसेही करून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग खुला आहे तो म्हणजे काबूल विमानतळ. अशा परिस्थितीत विमानतळावर प्रचंड गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, टोलो न्यूजने सांगितली की, तालिबान्यांनी विमानतळावर हिजाबशिवाय असलेल्या महिलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल अमेरिकन सैनिकांनीही गोळीबार केला. मीडिया रिपोर्टनुसार, या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तालिबानने विमानतळावर झालेल्या गोळीबाराची पुष्टी केली नाही. सध्या विमानतळ अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे.
काबूल सोडण्यासाठी हजारो लोकं विमानतळावर पोहोचले आहेत, ज्यांच्याकडे व्हिसाही नाही कि तिकीटही नाही. काबूलमध्ये मोबाईल रिचार्ज करण्यातही लोकांना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत, लोकं इंटरनेट आणि कॉल क्रेडिटची आणीबाणीसाठी बचत करत आहेत. तालिबानी सैनिक काबूलच्या रस्त्यावर फिरत आहेत. सामान्य नागरिकांना 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांच्या घरातच कैदेत राहण्यास सांगितले आहे.
https://twitter.com/NicolaCareem/status/1427122975971561475?
हा व्हिडिओ काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आहे. विमान पूर्णपणे हजारो लोकांनी वेढले गेलेले आहे. विमानाच्या केबिनच्या आत जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शिडीवर देखील लोकं विमानाच्या आत जाण्यासाठी जोर लावत आहेत.
काबूल विमानतळावरील दृश्य विमानतळासारखे कमी बसस्थानकासारखे जास्त दिसते. ज्याप्रमाणे बसच्या आत जाण्यासाठी एकच गोंधळ असतो, त्याचप्रमाणे विमानाच्या आत जाण्यासाठी एकच गोंधळ दिसून येतो आहे. जमावाला पांगवण्यासाठी विमानतळावरील अमेरिकन सैन्याने आज सकाळी हवेत गोळीबार केला. एका प्रत्यक्षदर्शीने AFP वृत्तसंस्थेला सांगितले, “मी इथे खूप घाबरलो आहे. ते हवेत खूप गोळ्या झाडत आहेत. ”
तालिबानने भयानक गुन्हेगारांना तुरुंगातून सोडले
या दरम्यान, तालिबानने तुरुंगात बंद असलेले भीषण गुन्हेगार आणि दहशतवाद्यांची सुटका केली आहे. मात्र, तालिबानच्या प्रवक्त्याने आपल्या सैनिकांना जबरदस्तीने कोणाच्याही घरात प्रवेश करू नका असे सांगितले.
अमेरिका विमानतळावर 6 हजार सैनिक तैनात करणार आहे
तथापि, अमेरिकेने म्हटले आहे की,” ते आपल्या 6,000 सैनिकांना विमानतळावर तैनात करतील, जेणेकरून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. सध्या काबूल विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती आहे. देश सोडण्यासाठी हजारो लोकं तेथे जमले आहेत. असे अनेक लोकं आहेत जे कोणतेही सामान न घेता विमानतळावर पोहोचले आहेत.