Plane Crash In Afghanistan : रशियाला जाणारे भारतीय विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले?? DGCA ने केला मोठा खुलासा

Plane Crashed In Afganistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाला जाणारे भारतीय प्रवासी विमान अफगाणिस्तान मध्ये कोसळलं (Plane Crash In Afghanistan) असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे विमान रशियातील मास्को या शहरात उतरणार होते,मात्र अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतामध्ये हे विमान क्रॅश झालं आहे . तेथील स्थानिक लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हे विमान भारतीय विमान … Read more

राष्ट्रपती भवनात शाही भोजन आणि पार्कमध्ये मौजमजा, तालिबान्यांच्या विजयाचे व्हायरल VIDEO पहा

काबूल । तालिबानच्या राजवटीपासून अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोक कसे तरी सर्वकाही मागे सोडून आपला जीव वाचवून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, लोकं विमानाच्या टायरवरून लटकण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून ते अफगाणिस्तानच्या बाहेरील भागात जाऊ शकतील. दरम्यान, तालिबान्यांचे विजय साजरा करताना आणि आराम करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातीलच … Read more

1.5 अब्जाहूनही जास्त आहे तालिबानचे वार्षिक उत्पन्न, शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्यासाठी अशाप्रकारे जमा करतात पैसे

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचे युग परत आले आहे. अल्पावधीतच या दहशतवादी संघटनेने संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, तालिबानला दहशतवादी योजना राबवण्यासाठी कोण फंडिंग कोण देते? तालिबान किती कमावते? ही संस्था शस्त्रे कोठून खरेदी करते? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात … संयुक्त राष्ट्रांच्या जून 2021 … Read more

काबूल विमानतळावर गोळीबारात 3 जण ठार, रस्त्यावर फिरत आहेत तालिबानी सैनिक

काबूल । तालिबानने अफगाणिस्तानात ताबा मिळवला आहे. तालिबानच्या भीतीमुळे लोक कसेही करून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग खुला आहे तो म्हणजे काबूल विमानतळ. अशा परिस्थितीत विमानतळावर प्रचंड गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, टोलो न्यूजने सांगितली की, तालिबान्यांनी विमानतळावर हिजाबशिवाय असलेल्या महिलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल अमेरिकन सैनिकांनीही गोळीबार केला. मीडिया रिपोर्टनुसार, … Read more

अफगाणिस्तान संकट: तालिबानने घनी सरकारशी शांततेच्या चर्चेसाठी ‘या’ कडक अटी मांडल्या

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचा गोंधळ सुरूच आहे. तालिबानने शुक्रवारी आणखी चार प्रांतांच्या राजधान्या ताब्यात घेतल्या. आता तालिबानने देशाच्या संपूर्ण दक्षिण भागाचा ताबा घेतला आहे. यासह, तो आता हळूहळू काबूलच्या दिशेने जात आहे. दरम्यान, काही संघटना आणि देशांनी तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता चर्चेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: जगातील अनेक देश यासाठी इस्लामाबादवर दबाव टाकत … Read more

राजीनाम्याच्या बातमीमध्ये अश्रफ घनी म्हणाले की,”तालिबानशी चर्चा सुरू आहे, 20 वर्षांची कामगिरी अशा प्रकारे संपू देणार नाही”

काबूल । अफगाणिस्तानातील तालिबानची वाढती दहशत आणि राजीनाम्याच्या वृत्तांमध्ये राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आज देशाला संबोधित केले. या दरम्यान ते म्हणाले की,”देशात अस्थिरतेचा गंभीर धोका आहे. त्याच वेळी, त्यांनी अफगाण लोकांना आश्वासन दिले की, भविष्यात ते थांबवले जाईल.” अशरफ घनी म्हणाले की,” आम्ही देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर सल्लामसलत सुरू करण्याबाबत बोलणी करत आहोत.” … Read more

अश्रफ घनी देणार राष्ट्रपती पदाचा राजीनामा, कुटुंबासह अफगाणिस्तान सोडण्याची तयारी – सूत्र

काबूल । अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. सूत्रांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की,”अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये सुरू असलेले हल्ले थांबवणे आणि तालिबानशी तात्काळ युद्धबंदी करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जाऊ शकते.” राजीनामा दिल्यानंतर घनी आपल्या कुटुंबासह “तिसऱ्या देशात” जाऊ शकतात असेही सूत्रांनी सांगितले. मात्र, अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह यासाठी सहमत … Read more

तालिबानची योजना, काबुलसह संपूर्ण अफगाणिस्तान 7 दिवसात नियंत्रणाखाली आणणार

नवी दिल्ली । राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान सात दिवसात ताब्यात घेईल. इस्लामिक ग्रुपच्या प्रवक्त्याने शुक्रवारी एका न्यूज चॅनेलला ही माहिती दिली. मात्र, तालिबानला अजिबात हिंसा नको आहे, असा दावा त्यांनी केला. तालिबानच्या प्रवक्त्याने या “मानवी संकटा” दरम्यान युद्धग्रस्त अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी जागतिक संस्थांना आवाहन केले. यासह, त्यांनी आश्वासन दिले की, आपण कोणत्याही परदेशी मिशन … Read more

युरोपियन युनियनने तालिबान्यांना दिला इशारा, म्हंटले,”जर त्यांनी हिंसेद्वारे सत्ता मिळवली तर याचा असा परिणाम होईल …”

काबूल । तालिबानने हिंसाचाराद्वारे सत्ता हस्तगत केल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायापासून वेगळे केले जाईल, असा इशारा युरोपियन युनियनने दिला आहे. तालिबानने काबूलपासून 130 किलोमीटरवरील हेरात आणि कंदहारवरही विजय मिळवला आहे. गुरुवारी, युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख योसेप बोरेल यांनी एक निवेदन जारी केले, “जर सत्ता बळजबरीने घेतली गेली आणि इस्लामी अमीरातची स्थापना झाली तर तालिबानला मान्यता … Read more

अफगाणी क्रिकेटर रशीद खानचे जागतिक नेत्यांना आवाहन, म्हणाला,”या संकटात आम्हाला मरायला सोडू नका”

नवी दिल्ली । अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, जिथे तालिबान आणि सरकारी सैन्य दलांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. तालिबान्यांनी देशाच्या बाहेरील भागांवर कब्जा केला आहे आणि आता ते प्रांतीय राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, तालिबानने एकतर अफगाणिस्तानचा 80 टक्के भाग काबीज केला आहे किंवा त्यासाठी युद्ध सुरू आहे. अमेरिकन … Read more