गुड न्यूज! वर्तमानपत्र घरपोच मिळणार; राज्य सरकारनं निर्णय बदलला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू केल्यानंतर केंद्रानं २० एप्रिलपासून राज्य सरकारने काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सर्शत परवानगी दिली होती. मात्र, यातून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी नाकारण्यात आली होती. यासंदर्भात चर्चा केल्यानंतर सरकारनं निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कोरोनाबाधित कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तींनी हे काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तपत्र वितरणाबाबत जनतेशी संवाद साधताना आपली भूमिका केली होती. यावेळी वृत्तपत्राच्या घरोघरी वितरणाला त्यांनी मनाई केली होती. राज्यातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून कुठलाही धोका पत्करण्यास आपण तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं होत. मात्र, आता मुंबई, पुणे आणि कोरोनाबाधित कंटेनमेंट झोन वगळून राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment