“पुढील आठवड्यात नवीन Income Tax Portal पूर्णपणे कार्यरत होईल”- Infosys चा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे सुलभ व्हावे म्हणून 7 जून रोजी नवीन आयकर ई-फाईलिंग पोर्टल (Income Tax e-filing Portal) मोठ्या उत्साहात लॉन्च करण्यात आले. परंतु हे लॉन्च होताच त्यात अनेक तांत्रिक त्रुटी येऊ लागल्या, ज्यामुळे करदात्यांना ITR दाखल करण्यात अडचणीचा सामना करावा लागला. हे पोर्टल विकसित करणार्‍या कंपनीच्या इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी दावा केला आहे की, या पोर्टलचे सर्व तांत्रिक दोष पुढील आठवड्यात निश्चित केले जातील. प्रवीण राव म्हणाले की,” आमची टीम नवीन प्राप्तिकर ई-फाईलिंग पोर्टल निश्चित करण्यावर काम करत आहे आणि बर्‍याच तांत्रिक त्रुटी दूर केल्या आहेत. आम्ही लवकरात लवकर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आशा आहे की, येत्या 4-5 दिवसात ते पूर्णपणे नीट होईल.” ते म्हणाले की,’ आता या पोर्टलवरून हजारो लोकांनी दररोज ITR दाखल केला आहे.”

नवीन पोर्टलद्वारे आतापर्यंत 1 लाखाहून अधिक करदात्यांनी त्यांचे ITR दाखल केले आहे
प्रवीण राव म्हणाले की,” नवीन पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक करदात्यांनी ITR दाखल केला आहे.” ते म्हणाले की,” 22 जून रोजी होणाऱ्या बैठकीत संबंधितांचे जे काही प्रश्न आणि फीडबॅक येतील ते योग्यरित्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू.” हे नवीन ITR पोर्टल लॉन्च होऊन दोन आठवड्यांहून अधिक कालावधी झाला आहे, परंतु त्यातील तांत्रिक दोष आणि त्रुटी अद्यापही कायम आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या या नवीन ई-फाइलिंग वेबसाइटवर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधिकारी 22 जून रोजी डेव्हलप करणार्‍या आयटी कंपनी इन्फोसिसशी बैठक घेतील.

पोर्टलमधील समस्या दूर करण्यासाठी 22 जून रोजी बैठक
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) प्रवक्त्याने सांगितले की, इन्कम टॅक्स पोर्टलमधील अडचण दूर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आयटी कंपनी इन्फोसिसच्या टीमशी 22 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान बैठक घेतील. ICAI, ऑडिटर्स कन्सल्टंट्स आणि करदात्यांसारखे अन्य भागधारकही या बैठकीत भाग घेतील. पोर्टलमधील सदोषपणामुळे करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे CBDT ने सांगितले. याचे निराकरण करण्यासाठी पोर्टलच्या संदर्भात सर्व भागधारकांकडून त्यांच्याकडून पोर्टलसंदर्भात अडचणी पाठविण्यास सांगितले गेले आहे. या बैठकीत इन्फोसिसचे प्रतिनिधी या समस्यांचे उत्तर देण्यासाठी उपस्थित राहतील, जेणेकरून माहितीची आदानप्रदान घेऊन समस्या सोडवता येतील.

युझर्सना ‘या’ समस्यांचा सामना करावा लागत आहे
नवीन ई-फाईलिंग पोर्टलवर करदात्यांना सतत तांत्रिक अडचणी येत असतात. यामध्ये लांब लॉग इन करणे, नोटिस आणि त्यावरील सेवांना प्रतिसाद देण्यात अडचण, पोर्टल आणि ई-फाइलिंग सिस्टमवर दाखवीत नसलेल्या मागील फाइलिंगशी संबंधित डेटा यासारख्या समस्या समाविष्ट आहेत. http://www.incometax.gov.in  हे नवीन पोर्टल 7 जून रोजी लॉन्च झाले. पहिल्या दिवसापासूनच त्यात त्रुटी आहेत. हे लक्षात घेता वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे सेल्फ पोर्टल तयार करणार्‍या आयटी कंपनी इन्फोसिसचे चेअरमन नंदन निलेकणी यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फाइलिंग वेबसाइटमध्ये येणाऱ्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यास सांगितले होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment