हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. काही शहरात लॉक डाउन केल्यानंतर आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टींचा विचार करुन राज्य सरकार सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले
विजय वडेट्टीवार म्हणाले, मुंबई पुणे अमरावती आणि औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु नागरिक अजूनही विना मास्कचे फिरत आहेत. हे असंच सुरु राहिलं तर आगामी काळात कठोर निर्णय घ्यावे लागतील.
कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते,” असे विजय वेडेट्टीवार म्हणाले
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’