हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुजरात येथे जवळपास 25 आमदारांसोबत असून राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते यांनी सूचक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला.
ठाकरेंचे दिवस फिरले, अस ट्विट करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. यापूर्वीही निलेश राणे सातत्याने ठाकरे कुटुंब आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत होते. आता एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्य मुळे राणेंनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
ठाकरेंचे दिवस फिरले…
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) June 21, 2022
दरम्यान, नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 25 आमदार गुजरात मध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे सरकार साठी हा मोठा धक्का मानला जात असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने चर्चाना उधाण आले आहे.