महापुराच्या नावाखाली शिवसेनेकडून नवी वसुली मोहीम; निलेश राणेंचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महापुराच्या मदतीवरून शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेकडून नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. त्याबाबतचे तसे ट्विटही त्यांनी केले आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूनला मदत करायची आहे सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय??, असा सवालही राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरटिका केली होती. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीने पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे कुठला अर्थतज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही, असे टीका करताना राणेंनी म्हंटले होते.