हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्याप्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याने काही दिवसांपूर्वी फाशी तर फाशी … जन्नतमध्ये गेल्यावर अप्सरा मिळेल असं विधान केलं होते. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त करत अशा लोकांसाठी गोळी हाच एकमेव मार्ग आणि शिक्षा आहे असं म्हंटल आहे.
याबाबत निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, श्रद्धा वालकरला ठार मारणारा आरोपी आफताबने पॉलीग्राफ टेस्टमध्ये श्रद्धाला मृत्यूनंतर जन्नत मिळेल अशी स्टेटमेंट दिली. अशा लोकांसाठी गोळी हाच एकमेव मार्ग आणि शिक्षा आहे, सरकारी वेळ आणि पैसा वाया घालू नका अशा हरामखोरांसाठी.
श्रद्धा वालकरला ठार मारणारा आरोपी आफताबने पॉलीग्राफ टेस्टमध्ये श्रद्धाला मृत्यूनंतर जन्नत मिळेल अशी स्टेटमेंट दिली. अशा लोकांसाठी गोळी हाच एकमेव मार्ग आणि शिक्षा आहे, सरकारी वेळ आणि पैसा वाया घालू नका अशा हरामखोरांसाठी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 2, 2022
दरम्यान, आफताबची कालच नार्को टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये त्याने अनेक प्रश्नाची उत्तरे देत खळबळजनक खुलासे केले आहेत. आफताबला 50 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले ज्यामध्ये श्रद्धाची हत्या आणि मृतदेहाचा ठावठिकाणासह अनेक रहस्ये उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नार्को चाचणीदरम्यान त्याने डॉक्टरांच्या टीमला सांगितले की, श्रद्धाने आपल्याला सोडून जाण्याची धमकी दिली होती. यामुळे तो संतापला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. आफताबची नार्को टेस्ट जवळपास दोन तास चालली. या दोन तासात आफताबला दिलेल्या केमिकलमुळे तो अनेकदा बेशुद्ध पडत होता. त्याला हलवून, थोपटून जागं करावं लागत होतं.