हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्रीच जर अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत??? आतंगवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 14, 2021
मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी कढून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना ह्या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी अशी मागणी निलेश राणे यांनी केली.
मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी कढून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना ह्या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 14, 2021
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा