हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये भाजपचे समाधान अवताडे विजयी झाल्यानंतर, आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले निलेश राणे पुन्हा एकदा महा विकास आघाडीच्या नेत्यांवर बरळले आहेत. अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभवावर तीव्र शब्दांमध्ये ट्विट केले आहे.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, ‘त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतातमंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग? असे ट्विट करून त्यांनी महविकास आघाडीवर मोठा निशाणा साधला आहे.
त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2021
पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे नशीब आजमावत होते. तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले होते. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची केली गेली होती.