Nilesh Sable : कॉमेडीच्या 3 एक्क्यांची नवी सुरुवात!! आगामी शोचा मजेदार प्रोमो रिलीज; तुम्ही पाहिला का?

Nilesh Sable
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nilesh Sable) ‘हसताय ना..? हसायलाच पाहिजे!!’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्गाची आपुलकीने विचारपूस करणाऱ्या डॉ. निलेश साबळेंची बातच काही और आहे. कधी अभिनेता, कधी लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून पेशाने डॉक्टर असलेला हा अवलिया कायमच प्रेक्षक वर्गाला खळखळून हसवत आला आहे. झी मराठीच्या माध्यमातून ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम त्याने वर्षानुवर्षे गाजवला. प्रेक्षकांची प्रचंड प्रेम घेऊन या कार्यक्रमाने अलीकडेच निरोप घेतला. यामुळे मनोरंजन थांबेल असं वाटत असताना आता निलेश साबळे धमाल कलाकारांच्या सोबतीने एक नवा शो घेऊन येत आहे. ज्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.

निलेश साबळेंचा नवा शो (Nilesh Sable)

निलेश साबळे लवकरच कलर्स मराठीच्या माध्यमातून एक धमाल कॉमेडी सो घेऊन येत आहेत. ज्याचे नाव ‘हसताय ना..? हसायलाच पाहिजे!!’ असे आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा केदा पोट धरून हसायला भाग पाडण्यासाठी निलेश साबळे सज्ज झाले आहेत.



यावेळी त्यांच्यासोबत असे अवली कलाकार दिसतील की, त्यांना पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा होईल. (Nilesh Sable) दरम्यान नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची टीम आणि प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव दिसत आहेत.

प्रेक्षकांना हसवायला ‘हे’ कलाकार सज्ज

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोच्या प्रोमोमध्ये पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अभिनेता ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांची जबरदस्त जुगलबंदी पहायला मिळतेय. या स्किटमध्ये हे दोघे ही स्त्रियांचे पात्र साकारताना दिसत आहेत. या दोघांच्या प्रभावी विनोदशैलीने प्रेक्षक लोटपोट होऊन हसतील यात काही शंका नाही. कारण प्रोमो रिलीजनंतर प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम त्यांची उत्सुकता दर्शवत आहे.



‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी केले आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत. या शोचा नवीन प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पाहू शकता. माहितीनुसार, हा कार्यक्रम येत्या २७ एप्रिल २०२४ पासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता कलर्स मराठी आणि कधीही #JioCinema ओटीटीवर पाहू शकणार आहात.