ओमिक्रॉनचा विस्फोट!! एकाच कुटुंबातील 9 जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा देशात शिरकाव झाला असून पुण्यात 7 रुग्ण सापडल्या नंतर राजस्थान मधील जयपूर येथे एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमीक्रोन ची लागण झाली आहे. या घटनेने देशभर खळबळ उडाली असून चिंता वाढली आहे.

राजस्थानच्या जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले. एक दाम्पत्य दोन मुलांसह दक्षिण ऑफ्रिकेतून जयपूरच्या आदर्श नगरमध्ये आले होते. त्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची बाधा झाली होती. त्यांच्यामुळे कुटुंबातील जयपूरमध्ये राहणाऱ्या अन्य पाच जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. हे दाम्पत्य 25 नोव्हेंबरला भारतात आले होते.

दरम्यान, या नऊ नव्या रुग्णांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांत सात नवे ओमिक्रॉनग्रस्त आढळले. या सर्व रुग्णांना मिळून आता देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. त्यामुळे ओमीक्रोनचा देशात हळू हळू फैलाव होत असून देशात खळबळ उडाली आहे.

You might also like