बजाज ऑटोचे नवे अध्यक्ष होणार निरज बजाज ! टेबल टेनिसमध्ये केले आहे भारताचे प्रतिनिधित्व, राहुल बजाजशी काय संबंध आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बजाज ऑटो (Bajaj-Auto) ने गुरुवारी नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे की,”बजाज ऑटोचे अध्यक्ष (Rahul Bajaj) यांनी राजीनामा दिला आहे.” कंपनीने म्हटले आहे की,”30 एप्रिल 2021 पासून राहुल बजाज यांनी नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि बजाज ऑटोचे अध्यक्ष म्हणून पद सोडले आहे.” राहुल बजाज 30 एप्रिल रोजी म्हणजेच आज राजीनामा देतील आणि त्यानंतर 1 मे पासून ते चेअरमॅन एमिरेट्स पदी विराजमान होतील. आता नीरज बजाज हे 1 मेपासून बजाज ऑटोचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.

राहुल बजाज यांनी हे पद का सोडले?
कंपनीच्या निवेदनानुसार 82 वर्षीय राहुल बजाज यांनी वयाचा हवाला देत हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते कंपनीत सल्लागाराच्या भूमिकेत असतील आणि त्याच्या अनुभवाचा फायदा कंपनीला होईल. कंपनीच्या बोर्डाने या निर्णयाला मान्यता दिली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, बजाज ग्रुप जवळजवळ 95 वर्षांचा आहे आणि राहुल बजाज स्वत: 82 वर्षांचे झाले आहेत. ते बजाज ग्रुपचे प्रमुख आहेत. त्याची एकूण संपत्ती सुमारे 6.5 अब्ज डॉलर्स आहे.

चला तर मग नीरज बजाज हे कोण आहेत ते जाणून घेऊयात
नीरज बजाज हे राहुल बजाज यांचे चुलत भाऊ (cousin Brother) आहेत. बजाज ऑटोचे नवे अध्यक्ष नीरज बजाज बजाज ग्रुपचे एक प्रमोटर-डायरेक्टर आहेत. नीरज बजाज जवळपास 67 वर्षांचे असून त्यांना या क्षेत्रात 35 वर्षांचा अनुभव आहे. आपल्या 35 वर्षांच्या कारकीर्दीत नीरज बजाज यांनी बजाज ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत. 9 सप्टेंबर 2006 रोजी ते बजाज ऑटो लिमिटेडच्या बोर्ड मध्ये दाखल झाले. त्यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले आहे. ते बजाज अलिअन्झ लाइफ अँड जनरल इन्शुरन्सच्या संचालक मंडळावरही काम करतात.

ते बच्चराज अँड कंपनीचे (Bachhraj & Company) जमनालाल संस (Jamnalal Sons ) आणि बजाजच्या अनेक सहाय्यक कंपन्याचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते मुकंद लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे ​​(BHIL) अध्यक्ष आहेत. बजाज ग्रुप (Bajaj Group) शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात सुमारे 40 चॅरिटेबल ट्रस्ट सांभाळते आणि नीरज बजाज या ट्रस्टचे कामकाज सांभाळत आहेत.

टेबल टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले गेले आहे
1970-77 दरम्यान नीरज बजाज यांनी 7 वर्षे टेबल टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी टेबल टेनिस स्पर्धेसाठी अर्जुन पुरस्कारही मिळविला आहे. नीरज बजाज हे Indian Merchants’ Chamber चे अध्यक्ष, Alloy Steel Producer’s Association आणि इंडियन स्टेनलेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अनेक उद्योगसमूहाचे प्रमुख आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment