दिल्ली | करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती आयकर आणि जीएसटी संदर्भात नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थमंत्रालयानं केल्या. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त परिषद घेऊन या घोषणा केल्या.
महत्वाच्या घोषणा –
- करोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर भरण्याची तारीख ३० मार्च ऐवजी ३० जून पर्यंत वाढवली आहे.
- उशीरा कर भरणार्यांसाठी १२ एवजी ९ टक्के दंड
- आधार पॅन लिंक करण्यासाठीची मुदत ३० जूनर्यंत
- ३० जूनपर्यंत आयकर परतावा भरण्याची मुदत
- विवाद से विश्वास योजनेची मुदत ३० जूनपर्यंत
जीएसटी रिटर्नची तारीख वाढविली
वित्तमंत्र्यांनी जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख ३० जून २०२० पर्यंत वाढविली आहे. तसेच जीएसटी रिटर्न दंड आकारण्याची तारीख सरकारने मार्च, एप्रिल, मे पर्यंत वाढविली आहे. यासह छोट्या व्यापऱ्यांना दिलासा देत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांकडून जीएसटी रिटर्न लेट फीस आकारला जाणार नाही. तथापि, ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ९ टक्के जीएसटी रिटर्न लेट फीस आकारली जाईल.
#WATCH Finance Minister Nirmala Sitharaman briefs the media in Delhi https://t.co/DasVFDRCas
— ANI (@ANI) March 24, 2020
The last date for the income tax return for the financial year 18-19 is extended to 30th June 2020. For delayed payments interest rate has been reduced from 12% to 9%: Union Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/Q3OHoh86SZ
— ANI (@ANI) March 24, 2020
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००
खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट
कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?
तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न