मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज चौथ्या टप्प्यातही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. आज (१६ मे) अर्थमंत्र्यांची चौथी पत्रकार षरिषद होणार आहे. चार वाजता होणाऱ्या बैठकीत आज काय घोषणा केल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
काल आपल्या तिसऱ्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित ११ महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. तसेच पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंबंधी यातील ८ घोषणा आहेत. तर प्रशासकीय सुधारणांसंबंधी ३ घोषणा आहेत. तसेच शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणाहि सितारमन यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केली होती.
Finance Minister Nirmala Sitharaman will address a press conference today at 4 PM. #EconomicPackage (file pic) pic.twitter.com/OLW8dAEpwI
— ANI (@ANI) May 16, 2020
आता आज निर्मला सितारामन काय घोषणा करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आज संध्याकाळी ठीक चार वाजता सितारमन यांची पत्रकार परिषद सुरु होणार असून यावेळी अर्थमंत्री कोणतीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”