हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 नव्या वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मोठी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मोठ्या शहरात गरज ओळखून मेट्रो तयार केल्या जाणार आहेत. अनेक ठिकाणी मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार असून त्यासाठी वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आनल्या जाणार आहेत. याचा लाभ हा छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना होणार आहे.
2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरू करण्यात येईल तसेच रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार आहे. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. मात्र, तरीरी जीडीपी 9.2 टक्के राहील. शिवाय आपल्या अर्थसंकल्पात येत्या पंचवीस वर्षांची ब्लू प्रिंट असेल, असेही त्यांनी सांगितले.
वर्षभरात २५ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार – सीतारमण
देशाच्या अर्थव्यवस्थेला चालणा देण्यासाठी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची सुरुवात करण्यात आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे २५ हजार किलोमीटरने वाढवण्याची घोषणा सीतारामण यांनी केली.