हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा फोर्ब्सच्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत 32 व्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये राजकारण, व्यवसाय, वित्त, मीडिया आणि मनोरंजन अशा क्षेत्रात नावलौकिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी राजकारण आणि देशातील धोरणांमधील योगदानासाठी फोर्ब्सने त्यांच्या यादीत 64 वर्षीय निर्मला सीतारामन यांना स्थान दिले आहे.
निर्मला सीतारामन यांच्याबरोबर फोर्ब्सच्या यादीत छाप सोडणाऱ्या भारतीय महिलांमध्ये रोशनी नाडर 60 व्या स्थानावर सेलच्या सोमा मंडल 70 व्या स्थानावर आणि किरण मुझुमदार 76 व्या स्थानावर आहेत. निर्मला सीतारामन यांची 2019 मध्ये भारताच्या अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून ही काम केले आहे. आजवर राजकीय आणि देशाच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या धोरणांमध्ये दिलेल्या योगदानामुळे निर्मला सीतारामन यांना फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादी स्थान मिळाले आहे.
पहिल्या तीन महिला कोण?
नुकतीच फोर्ब्सने जगातल्या 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आहेत. दुसऱ्या क्रमांकावर युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टीन लगार्डे या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरिस या आहेत.