बिहारमध्ये नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला राणे बंधूंचा टोला, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे. बिहारमध्ये शिवसेनेनं लढवलेल्या 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय.

निलेश राणे यांनी काही मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी ट्वीट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी असं लिहीत, ‘वारंवार देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’ अशी उपरोधिक टीका निलेश राणे यांनी केली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेवर चांगलाच हल्ला चढवला. “बिहारमधील मुस्लिमबहुल भागात काँग्रेस सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतं तर त्या ठिकाणी भाजप उमेदवारांना चांगली मतं मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. हा महाराष्ट्र इफेक्ट आहे का? महाराष्ट्रात शिवसेनेसोबत गेल्यामुळे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर आपली व्होट बँक गमवावी लागत आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी एक चार्ट ट्वीट करत काँग्रेसला पारंपरिक मतांमध्ये बसलेला फटका दाखवला आहे. तो दाखवताना राणे यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

 

 

 

 

Leave a Comment