हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष परब हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी काल गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री चिदंमबरम यांचा फोटो ट्विट केला होता. त्या फोटाला राणे यांनी “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” अशा आशयाचे वाक्य वापरले होते. दरम्यान, याच ट्विटवरून राणेंना त्रास सहन करावा लागल्याने अखेर ते ट्विट नितेश राणे यांनी डिलीट केले आहे.
काल कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी नितेश राणे यांनी अमित शाह आणि चिदंमबरम यांचा फोटो वापरून एक ट्विट केले होते. 2009 ला पी. चिदंमबरम गृहमंत्री असताना अमित शाह यांना अटक झाली होती, तर अमित शाह गृहमंत्री असताना चिदंमबरम यांना अटक झाली होती. त्यामुळे नितेश राणे यांना महाविकास आघाडीला आमचीही वेळ येईल तेव्हा तुम्हालाही अशीच वागणूक मिळेल, असा इशारा या ट्विटमधून दिला होता. दरम्यान या ट्विटमुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाली असल्याने त्यांनी अखेर ते ट्विट डिलीट केले आहे.
दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. तसेच त्यांना गोव्यालाही नेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा नितेश राणे यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यातून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. दरम्यान, नितेश राणे यांची कस्टडी उद्या संपत असल्याने उद्या कोर्टात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.