हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे यांनी सहभाग घेत ठाकरे सरकार वर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. पण या माणसाला कणा आहे का पाहायला पाहिजे. कणा असलेला माणूस सामान्य माणसासोबत असं वर्तन करणार नाही अशी टीका नितेश राणे यांनी केली.
कमिशन खाण्यासाठीच राज्य सरकारला विलनीकरण नकोय असे निलेश राणे यांनी म्हंटल. वाय फाय असो, टायरच्या किमती यामध्ये कमिशन कसं खाणार? शासनामध्ये विलिनीकरण झालं तर अनिल परब कशी वसुली करणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. परिवहन मंत्री विचारतात तुमच्या काळात विलिनीकरण का केलं नाही. पण भाजप सरकार असताना परिवहन मंत्री तर दिवाकर रावते होते. दिवाकर रावते एमआयएममध्ये गेलेत का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
सदाभाऊंच्या इंटरव्ह्यू वरून कोपरखळी-
सदाभाऊ खोत यांना फार मच्छर चावतात असा इंटरव्यू सध्या जोरदार व्हायरल केला जात आहे. सदाभाऊ खोतांना मला सांगायचंय दोन तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, अनिल परब यांच्या घरी ते सोडायचे आहेत. जेणेकरुन मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कारटा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे असेही राणे यांनी म्हंटल.