मुंबई | लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेऊन रामनामाचा जप करणारे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येला घेऊन जाणार आहेत. त्यांच्या ड्रामेबाजीवर युवा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे जोरदार निशाणा साधला आहे. शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला असं ट्विट राणे यांनी केलं आहे.
जे शिवजयंतीला कधी शिवनेरी किल्ल्यावर जात नाहीत, ते राजकारणासाठी मात्र तिथली माती उचलायला तयार झाले आहेत, हे वास्तव मांडताना नितेश राणे यांनी “शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला..शिवराय लक्षात ठेवतील, कधी न येणा-या कावळ्यांना” असं राणे यांनी म्हटलं आहे.
शिवजयंती ला कधी न जाणारे..
चालले आहेत शिवनेरीला..
शिवराय लक्षात ठेवतील..
कधी न येणाऱ्या कावळ्यांना!!— Nitesh Rane (@NiteshNRane) November 21, 2018




