नितेश राणेंना अटक होणार?? ‘हे’ प्रकरण भोवण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणात नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनी यावरून सरकार वर आरोप करत नितेशला सरकार कडून अटक करण्याची शक्यता दिसते अस म्हंटल आहे.

संतोष परब यांच्यावर हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितेश राणे यांची चौकशीही केली होती.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावरून राज्य सरकार वर निशाणा साधला आहे. पोलिस आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत. ते नितेश राणे आणि माजी जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेचे प्रयत्न करत असल्याचा आरोप राणे नारायण यांनी केला आहे

Leave a Comment