हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची तब्बेत बिघडली आहे. नितेश राणेंचा रक्तदाब वाढला असून त्यांना रुग्णवाहिकेने कोल्हापूर ला हलवणार आहेत.
शुक्रवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले होते. काल रात्रीपासून नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरीही नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. अशातच ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि ह्रदयरोग तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे नितेश राणे यांना कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात येणार आहे
कोर्टाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यावेळी नितेश यांच्या वकिलांनी नितेश यांची प्रकृती ठिक नसल्याचं सांगितलं होतं. राणे यांच्या आजारावर शिवसेनेने टीका केली होती. दरम्यान, राणे खरोखरच आजारी आहेत की हा राजकीय आजार आहे? असा सवाल शिवसेनेने केला होता.