महिला उद्योजकतेच्या प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यासाठी Flipkart ने नीति आयोगाशी केली हातमिळवणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वॉलमार्टच्या (Walmart) मालकी असलेल्या फ्लिपकार्ट (Flipkart) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी महिला उद्योजकतेच्याप्लॅटफॉर्मची नवीन आवृत्ती बाजारात आणण्यासाठी नीति आयोगाशी हातमिळवणी केली आहे. कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली. महिला उद्योजकता मंच (WEP) हे देशातील विविध भागातील महिलांना उद्योजकतेच्या आकांक्षा साकारण्यासाठी जोडणारे हे पहिले एकात्मिक पोर्टल आहे. या नवीन आवृत्तीत संबंधित भागाच्या समस्येबद्दल विशिष्ट ज्ञान असलेल्या महिलांना सल्ला देण्यासाठी अतिरिक्त सुविधा जोडली गेली आहे.

माहिती ऑनलाईन दिली जाईल
महिलांना सल्ले देण्यासाठी फिक्की- एफएलओच्या ग्रेटर 50 टक्के मिशनच्या सक्षमीकरणासाठी समर्पित ऑनलाईन सिस्टिमद्वारे सुविधा दिली जाईल. महिला उद्योजकांना डब्ल्यूईपीच्या मदतीने लाभ मिळेल असे कंपनीने या निवेदनात म्हटले आहे.

https://t.co/9gUYtN5Uox?amp=1

महिला उद्योजकांच्या समस्येवर तोडगा निघेल
महिला उद्योजकांना बर्‍याचदा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कुटुंबातील संतुलन, मार्गदर्शकाचा अभाव, नेटवर्किंगची समस्या यामुळे पुरेसा अनुभव मिळाल्यानंतरही महिलांना विशेष स्थान मिळू शकत नाही. कंपनी म्हणते की, जेव्हा महिला एकत्र येतात किंवा समुदाय तयार करतात तेव्हा त्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते तयार असतात.

https://t.co/TIbSulA9Od?amp=1

अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आहेत
महिला उद्योजक मंचचा उद्देश महिला उद्योजकांना ज्यांना व्यवसाय स्थापनेचा अनुभव आहे आणि ज्यांना नवीन व्यवसाय स्थापित करण्यासाठी विविध प्रकारची माहिती हवी आहे त्यांना जोडणे हे आहे. यामध्ये नोंदणीकृत व्यवसाय, जीएसटी, फंडिंग, साथीच्या रोगाचा प्रभाव, आधीच स्थापित व्यवसायांची प्रगती यासारख्या प्रश्नांचा समावेश आहे.

https://t.co/cGV4Ck0OFh?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment