पवारांच्या बालेकिल्ल्यात गडकरी-फडणवीसांचा शड्डू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | योगेश जगताप

भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाच्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या कोनशीला अनावरणाचा कार्यक्रम आज सातारा येथे पार पडला. यावेळी केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी विकास मंत्री ना.नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्याच्या १४७ किमी कामाचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आमदार उपस्थित होते.

खंबाटकी घाटातील नवीन बोगदा तसेच रस्त्याचे सहापदरीकरण काम २०१० पासून रखडलेले होते. त्या काळी २२५ करोड रुपये खर्चाचं काम कॅगने वेळोवेळी दाखवलेल्या त्रुटींमुळे लांबणीवर पडत गेले. ना.नितीन गडकरी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे काम होऊ शकले असं मत रस्ते विकास प्राधिकरणाचे विकास अधिकारी तावडे यांनी व्यक्त केले. ११५० मीटर लांबीचा हा बोगदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविण्यात येणार असून व्हेंटिलेशन, व्हिडीओ निरीक्षण, बोगद्याच्या आतील रस्त्याची १६ मीटर विस्तृत लांबी या खास सुविधा या कामात पहायला मिळणार आहेत. ९१८९ करोड रुपयांचा भरीव निधी यानिमित्ताने सातारा जिल्ह्याला देण्यात आला आहे. राज्य व केंद्र सरकारने दाखवलेल्या तत्परतेबद्दल ना.उदयनराजे यांनी सरकारचे अभिनंदन केले. मराठा आरक्षणाच्या धाडसी निर्णयाबद्दलही मुख्यमंत्र्यांचं कौतुक त्यांनी केलं. राजकीय मतभेद असतानाही उदयनराजे यांनी अनुपस्थित असलेल्या रामराजेंचा केलेला उल्लेख व शिवेंद्रसिंहराजे यांचं कौतुक सर्वांच्या लक्षात राहीलं.

सेना-भाजप सरकार एकत्र आल्यानंतर २६ जानेवारीच्या पहिल्या भाषणात पालकमंत्री म्हणून ४ काम प्राधान्याने पूर्ण करण्याचं आश्वासन मी दिलं होतं. खंबाटकी घाटाचं काम सुरु करणे, जिहे-कठापुरचं पाणी माण-खटावला देणे, वैद्यकीय महाविद्यालयाचं काम मार्गी लावणे आणि रोजगारनिर्मितीचा प्रश्न सोडवणे ही ४ कामं आज पूर्णत्वाकडे निघाली असल्याचं मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केलं.

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment