नितीन गडकरींची मोठी घोषणा ; वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार

nitin gadkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. सरकार पुढील वर्षभरात टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं.

आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारनं येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे,” असंही त्यांनी सांगितलं. टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही तर केवळ टोलनाके हटवणं असा आहे.

टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हांला 7972630753 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News