जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी नितीश कुमार! लल्लन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय

nitish kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिल्लीमध्ये नुकतीच जनता दलाची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान जनता दलाचे अध्यक्ष लल्लन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आ जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. लल्लन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदी नितीश कुमार यांना नियुक्त करावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावानंतरच पुन्हा एकदा नितेश कुमार यांची जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

सध्या नितेश कुमार यांची जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून “नितीश कुमार जिंदाबाद” अशा जोरदार घोषणा सुरू आहेत. तसेच नितीश कुमार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे अशाही घोषणा देण्यात येत आहेत. जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी निलेश कुमार यांची निवड झाल्यानंतर मंत्री विजय कुमार चौधरी यांनी म्हणले की, आता नितेश कुमार यांच्याकडे जनता दलाची जबाबदारी आली आहे. यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री असताना अध्यक्षपद स्वीकारले होते.

दरम्यान, जनता दल संयुक्तची जबाबदारी नितेश कुमार यांनी स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे अनेक जबाबदारी आल्या आहेत. त्यामुळे आता इथून पुढे जागावाटप कोणत्या पक्षाशी युती, आघाडी करायची का नाही? हे सर्व अधिकार दिनेश कुमार यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे आता जनता दलात कोणत्या घडामोडी घडतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.