JDU- BJPचं कशामुळे तुटलं? मोदींनी सांगितलं कारण .. तर नितीशकुमारांचेही प्रत्युत्तर

0
128
Nitishkumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि आरजेडी सोबत सत्तास्थापन केलं. नितीशकुमार यांच्या या धक्कातंत्रामुळे भाजपला आणि पर्यायाने मोदी शहांना एकप्रकारे शह बसला. मात्र या मोठ्या राजकीय उलथापालथी नंतर भाजप नेते सुशील मोदी यांनी नितीशकुमार यांना उपराष्ट्रपती न केल्यानेच त्यांनी भाजपसोबत युती तोडली असा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर नितीशकुमार यांनीही प्रत्युत्तर देत हा केवळ विनोद आहे असं म्हणत विषय संपवला.

सुशील मोदी नेमकं काय म्हणाले-

नितीशकुमार यांना उपराष्ट्रपती व्हायचे होते. त्याबाबत जेडीयूच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपाशी संपर्क साधत शक्यता पडताळून पाहिली होती तसेच त्यादृष्टीने बोलणी देखील केली होती. मात्र ही बोलणी यशस्वी न झाल्यानेच नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले असा मोठा दावा सुशील मोदी यांनी केला.

नितीशकुमार यांचे प्रत्युत्तर-

सुशील मोदी यांच्या या दाव्यानांतर नितीशकुमार याना विचारलं असता, कसला विनोद करत आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींचे आरोप फेटाळले. तसेच त्यांना काय बोलायचं ते बोलूद्या. माझी उपराष्ट्रपती होण्याची कोणतीही इच्छा नाही. त्यांच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला आम्ही कितपत पाठिंबा दिला हे विसरले का? आम्ही निवडणूक संपण्याची आणि त्यानंतर बैठक बोलावण्याची वाट पाहत होतो,” असं नितीशकुमार यांनी सांगितलं आहे