हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात अनेक बँकांकडून खरेदीवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. अशातच कंपन्यांकडून No-cost EMI ची सुविधा देखील दिली जात आहे. याला नो कॉस्ट इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट किंवा झिरो कॉस्ट EMI असे म्हणूनही ओळखले जाते. सध्याच्या काळात हे खूपच लोकप्रिय बनले आहे. बहुतेक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय या पर्यायाद्वारे खरेदीची सुविधा देत आहेत. त्याच्या मदतीने वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, टीव्ही, मोबाईल फोन आणि इतर गोष्टी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय खरेदी करता येतात.
हे जाणून घ्या कि, सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या आणि रिटेल विक्रेत्यांकडून No-cost EMI ची ऑफर दिली जाते. या अंतर्गत कोणतेही व्याज आणि अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. मात्र, यामध्ये असेही काही शुल्क आहेत, ज्याची माहिती आपल्याकडे असायला हवी, अन्यथा आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागू शकेल.
‘हे’ छुपे शुल्क द्यावे लागतील
No-cost EMI हा एक असा आर्थिक पर्याय आहे, ज्याद्वारे कोणत्याही व्याजाशिवाय अनेक मासिक हप्त्यांमध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो. मात्र हा पर्याय आकर्षक वाटत असला तरीही ज्या गोष्टींवर ही सुविधा देण्यात आली आहे त्याची किंमत जास्त असू शकते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच, या अंतर्गत जास्त प्रोसेसिंग फीस आणि जास्त डिलिव्हरी चार्जेस लपलेले असू शकतील. अशा परिस्थितीत ग्राहकांनी काळजीपूर्वक हा पर्याय निवडायला हवा.
No-cost EMI खरेदी करण्यापूर्वी हे काम करा
जर आपण या अंतर्गत एखादी वस्तू खरेदी करणार असाल तर सर्वात आधी यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल. यासोबतच बँकेचा 18 टक्के जीएसटी देखील भरावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, No-cost EMI अंतर्गत कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठीची मुदत आणि अट, कालावधी, प्रोसेसिंग फी, प्री-क्लोजर फी, प्री-पेमेंट दंड आणि लेट पेमेंट चार्ज इत्यादींबाबतची माहिती घेणे आवश्यक आहे.
हे जाणून घ्या कि, 17 सप्टेंबर 2013 रोजीच्या आपल्या परिपत्रकात RBI ने देताना म्हंटले की, झिरो कॉस्ट ईएमआयची संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा योजनांद्वारे फक्त असुरक्षित ग्राहकांना आमिष दाखवून त्यांचे शोषण केले जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/FS_Notification.aspx?Id=12300&fn=2&Mode=0
हे पण वाचा :
Stock Market मधील अप्पर सर्किट अन् लोअर सर्किट काय असते ??? तपासा याचे नियम
Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
Bank Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, घर सोडण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची लिस्ट
Multibagger Stock : देशातील सर्वात मोठ्या ग्रुपच्या ‘या’ शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट
SBI खातेधारकांनी पॅन नंबर अपडेट केला नाही तर YONO खाते बंद होणार, तपासा ‘या’ मेसेज मागील सत्यता