कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय नको ओबीसी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नवाज सुतार यांनी याबाबतची मागणी केली आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका होवू नयेत अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू असा इशारा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवाज सुतार यांनी दिला आहे.
यावेळी सर्व पदाधिकारी यांनी स्पष्ट केले याबाबतचे निवेदन कराडचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी साजिद मुल्ला, जावेद नायकवडी, मोहसीन कागदी, समीर संदे, साबिरमिया मुल्ला, समीर कुडची, वसिमभाई शेख, शाहरुख मुजावर, सरफराज सय्यद, नजर मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारला विनंती आहे. ओबीसी आरक्षणास मागील काही महिन्यांपासून स्थगिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. राज्य सरकारकडून इंपरियल डेटा सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणा संदर्भात जे काही कागदपत्रे सादर करायची आहेत. ती कागदपत्रे सादर करून आरक्षणाचा विषय संपवावा, तसेच जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना स्थगिती द्यावी. अन्यथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सादिक भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येणार आहे.