हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI : आता मार्च महिना सुरु आहे. आता आर्थिक वर्ष 2022-2023 संपायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. तसेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. हे लक्षात घ्या कि, या काळात आपण वर्षभरात केलेल्या सर्व खर्चाची गणना करतो. मार्च महिन्यातच सर्व खात्यांचे हिशोब करून ते क्लोझ केले जातात. अशा परिस्थितीत आता रविवारी सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयकडून देण्यात आल्या आहेत. वास्तविक, 31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बँकांमध्ये क्लोझिंगचे काम केले जाते. यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी शाखा चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, ग्राहकांसाठी या दिवशी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. तसेच, बँकेच्या शाखेमध्ये चेक जमा करता येतील. तसेच, या दिवशी ऑनलाइन बँकिंगही सुरू राहणार आहे. 31 मार्चनंतर 1 आणि 2 एप्रिलला सलग दोन दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. RBI
RBI ने काय निर्देश दिले ???
“सर्व एजन्सी बँकांनी 31 मार्च 2023 रोजी सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी ट्रान्सझॅक्शनशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी त्यांच्या नियुक्त शाखा खुल्या ठेवाव्यात,” असे RBI च्या पत्रात म्हटले गेले आहे. त्यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सिस्टीमद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत ट्रान्सझॅक्शन सुरू राहतील. तसेच, 31 मार्च रोजी सरकारी चेक जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी RBI चे डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल.
31 मार्च रोजी करा ‘या’ सर्व गोष्टी
31 मार्च आधी आपले आधार पॅनशी लिंक करा. असे केले नाही तर 1 एप्रिलपासून आपल्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही. पंतप्रधान वय वंदना योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधीही याच दिवशी आहे. याशिवाय 31 मार्चपूर्वी ITR देखील भरावा लागेल अन्यथा दंड भरावा लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर
Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
देशातील Moto G32 बनला सर्वात स्वस्त फोन ! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर