मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (No interim relief to Arnab Goswami in Bombay HC)
अर्णव गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी नाईक कुटुंबांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी नाईक कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी बंद करून तसं न्यायालयाला कळवलं आहे. त्यामुळे हे प्रकरण बंद करावं आणि अर्णब गोस्वामी यांना मुक्त करावं या करता अर्णब यांचे कुटुंबीयही उच्च न्यायालयात गेले आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in