आता आधार कार्ड, DL आणि RC सोबत बाळगण्याची गरज नाही ! Paytm App मध्ये Digilocker इंटीग्रेट केले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी Paytm च्या युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, आता Paytm युझर्स Digilocker वापरू शकतील. कंपनीने आपल्या Mini-App Store द्वारे Digilocker इंटीग्रेट केले आहे. Digilocker हे एक प्रकारचे व्हर्चुअल Digilocker आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने दिलेले हे क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म आहे.

या इंटीग्रेशनमुळे Paytm युझर्सना त्यांच्या सर्व सरकारी रेकॉर्ड्स DigiLocker वरून मिळू शकतील. युझर्स ऑफलाइन असतानाही याचा वापर केला जाऊ शकतो. पेटीएम युझर्स आता DigiLocker द्वारे आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हेईकल आरसी आणि इन्शुरन्स यांसारखे डॉक्युमेंट्स सेव्ह करू शकतील.

आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्स सारखी कागदपत्रे DigiLocker मध्ये सेव्ह करून परत मिळवता येतात. युझर्स DigiLocker वरील सेल्फ KYC आणि व्हिडिओ KYC साठी डॉक्युमेंट्स वापरू शकतात. ज्या युझर्सनी Paytm द्वारे कोरोनाची लस बुक केली आहे ते DigiLocker वर त्यांचे व्हॅक्सिन सर्टिफिकेट जोडू शकतात.

डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी आणि एक्सेस करण्यासाठी, युझर्सना Paytm App वरील आपल्या डॉक्युमेंट्स मधील प्रोफाइल सेक्शनमध्ये जाणे आवश्यक आहे. एकदा DigiLocker वर डॉक्युमेंट्स लिंक केली गेली की, त्यांच्याकडे कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असली किंवा ऑफलाइन असला तरीही त्यांना एक्सेस करता येतो.

Leave a Comment