औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी, दरोडे, यांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अनोळखी लोकांचा गावातील वावर हा देखील गावकऱ्यांची चिंता वाढविणारा आहे. अशा घटना रावखण्यासाठी औरणगाबद ग्रामीण पोलिसांनी अनोखी शक्कल लढविली आहे. देवगाव रंगारी पोलिसांनी हद्दीमधील अनेक गावात मोफत सायरन सायरन गावकऱ्यांना दिले.
गावात किंवा घराजवळ संशयित व्यक्ती, टोळी आढळल्यास या सायरन चा उपयोग करावा अशा सूचना गावकऱ्यांना देण्यात आले असून पोलिसांनी कशा पद्धतीने याचा वापर करायचा याचे प्रात्यक्षिक देखील नागरिकांना करून दाखविले.
पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे येत्या काळात चोरीच्या प्रमाणात नक्किच घट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या या अनोख्या शक्कलचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.