कोरोनाग्रस्त जिल्हे रेड झोनमध्ये ही साफ खोटी बातमी – विश्वजित कदम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा काहीसा दिलासा मिळाला असतानाच सरकारने कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार तीन झोनमध्ये विभागणी केली. पंधरापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोन’मध्ये टाकण्यात येणार असून त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश होणार असल्याची माहिती सर्वत्र पसरताच कोरोना बाधित जिल्हे रेड झोन मध्ये समाविष्ट केल्याचे वृत्त कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी आज फेटाळले आहे.

सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यांसह अन्य जिल्हे रेड झोन मध्ये समाविष्ट केलेत ही खोटी बातमी आहे. केंद्र अथवा राज्य सरकार ने असे कोणतेही झोन घोषित केले नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्टीकरण देत १४ तारखेनंतर ही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. अद्याप असे कोणत्याही प्रकारचे झोन सरकार अथवा शासनाकडून केले नसल्याचे कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी आज सांगितले. अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आज सांगलीतील शिवेभोजन केंद्राची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

विश्वजित कदम यांनी शिवभोजन येथे जाऊन लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदार्थांची पाहणी करत विचारपूस केली. यावेळी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, जो शिशोंके घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या टिकेवर राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी टोला लगावला आहे. महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली ही सर्वांना माहीत असल्याच त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. चंद्रकांतदादांसारख्या जेष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं चुकीचे आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारण करू नये. आत्ता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ असल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

a

Leave a Comment