नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचे निधन? मुलगी नंदनाने दिली मोठी माहिती

Amartya Sen's
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र ही बातमी खोटी असून अमर्त्य सेन यांच्या निधनाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, अशी माहिती मुलगी नंदना देब सेन यांनी दिली आहे. नंदना देब सेन यांनी अमर्त्य सेन यांच्या मृत्यूच्या वृत्ताचे खंडन केले असून सेन हे निरोगी असल्याचे सांगितले आहे.

अमर्त्य सेन यांच्या तब्येतीविषयी माहिती देत नंदना देब सेन यांनी म्हणले की, “मित्रांनो, तुम्हाला वाटत असलेल्या चिंतेबद्दल धन्यवाद, पण ही फेक न्यूज होती. बाबा पूर्णपणे बरे आहेत. आम्ही सर्वजण केंब्रिज येथे एक आठवडा घालवला. काल रात्री तिकडून येताना त्यांनी मला मिठी मारली. ते हार्वर्डमध्ये दर आठवड्याला दोन अभ्यासक्रम शिकवत आहेत. लिंगभेदावर ते एक पुस्तक लिहित असून त्याच्या कामात नेहमीप्रमाणे व्यस्त आहेत” त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला.

अफवा कशी पसरली?

नोबेल पारितोषिक विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांच्या नावाने ट्विटरवर असणाऱ्या अकाउंटवरून अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली होती. याच पोस्टचा हवाला देत पीटीआय या वृत्त संस्थेने देखील सेन यांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली होती. यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. परिणामी अमर्त्य सेन यांच्या निधनाची बातमी वेगवेगळ्या माध्यमांकडून देखील देण्यात आली. यानंतर लगेचच सेन यांची मुलगी नंदना देब सेन हिने वृत्ताचे खंडन केले. त्यानंतर पीटीआयकडून देखील ही पोस्ट हटवण्यात आली.