हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Nokia चा C-सीरीजचा नवीन मोबाईल Nokia C31 लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंच डिस्प्लेसह 5050mAh बॅटरी आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलची खास वैशिष्ठ्ये आणि त्याच्या किमतीबाबत…
Nokia C31 मध्ये ६.७४ इंच (Nokia C31) एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन Android 12 वर चालतो. या मोबाईल मध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर आहे.
13MP कॅमेरा – (Nokia C31)
मोबाईलच्या कॅमेरा बाबत बोलायचं झाल्यास, नोकियाच्या या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 13MP चा मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5MP कॅमेरा मिळतो. या कॅमेरा सेटअपमध्ये पोर्ट्रेट मोड, एचडीआर आणि नाईट मोड सारखे अनेक मोड देखील मिळतात.
5,050mAh बॅटरी –
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, या मोबाईल मध्ये 2.0 microUSB चार्जिंग पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ 4.2 सपोर्ट, Wi-Fi आणि GPS आहे. या स्मार्टफोनला 10W चार्जिंग सपोर्टची 5,050mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा चार्ज झेल्यांनंतर ही बॅटरी तब्बल ३ दिवस चालेल.
किंमत –
Nokia C31 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या 3GB + 32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा मोबाईल चारकोल, मिंट आणि सायन कलर मध्ये उपलब्ध आहे. नोकियाचा हा मोबाईल अधिकृत ई-कॉमर्स साइट आणि रिटेल आउटलेटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
हे पण वाचा :
भारतात Oppo A58x 5G स्मार्टफोन लॉन्च, आता कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
108MP कॅमेरा असलेला OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फीचर्स तपासा
Vivo Y35 5G : Vivo ने लॉन्च केला 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स
Redmi Note 12 Series लॉन्च; 200MP कॅमेरा अन् बरंच काही